चंद्रपुरातील दारुबंदी फसवी : शिवसेना

जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या दारूबंदीला सरकारमध्ये सहभागी शिवसेना आमदारानेच विरोध केला आहे. ही दारुबंदी फसवी, असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

Updated: Jun 6, 2015, 09:02 AM IST
चंद्रपुरातील दारुबंदी फसवी : शिवसेना title=

चंद्रपूर : जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या दारूबंदीला सरकारमध्ये सहभागी शिवसेना आमदारानेच विरोध केला आहे. ही दारुबंदी फसवी, असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

दारूबंदी लागू होऊन जेमतेम दीड महिनाच उलटते न उलटते तोच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा क्षेत्राचे शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना पत्र लिहून दारूबंदीचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. 

चंद्रपुरातील दारूबंदीला सुमारे ६५ दिवस झाले आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा लिकर संघटनेने पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील दारूबंदी पूर्णपणे फसवी असून पत्रपरिषदेत थेट दारूच्या बाटल्या सादर करत, दारूचा सुळसुळाट सुरु असल्याचा आरोप केला. 

हे आरोप सिध्द करण्यासाठी लिकर संघटनेने शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांचे एक पत्रच सदर केले आहे. धानोरकर यांनी १७ मे रोजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांना एका पत्रातून जिल्ह्यातील दारूबंदी कशी अन्यायकारक आहे याचाच पाढा वाचला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.