अर्ध्यारात्री तडीपार गुंडांनी घातला हैदोस, लोक पाहात राहिले...

चिंचवडमधल्या आनंदनगर परिसरात तड़ीपार गुंडानं आपल्या साथीदारांसह गाड्यांची आणि घरांची प्रचंड तोडफोड केली. या घटनेमुळे शहरात तोडफोडीचं सत्र थांबण्याचं चिन्ह दिसत नसल्याचं स्पष्ट झालंय.

Updated: Nov 27, 2015, 11:32 AM IST
अर्ध्यारात्री तडीपार गुंडांनी घातला हैदोस, लोक पाहात राहिले...  title=
प्रतिकात्मक फोटो

पिंपरी चिंचवड : चिंचवडमधल्या आनंदनगर परिसरात तड़ीपार गुंडानं आपल्या साथीदारांसह गाड्यांची आणि घरांची प्रचंड तोडफोड केली. या घटनेमुळे शहरात तोडफोडीचं सत्र थांबण्याचं चिन्ह दिसत नसल्याचं स्पष्ट झालंय.

व्हिडिओ : पाहा संपादकाचं आत्मदहन कॅमेऱ्यात कैद

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चिंचवडचा तडीपार गुंड अविनाश पवार त्याच्या तीन ते चार साथीदारांनी रात्रीच्या सुमारास आनंदनगर झोपड़पट्टीत धुडगुस घातला. पवार आणि त्याचे साथीदार हातात लोखंडी हत्यार घेऊन आले आणि त्यांनी घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी गाड्यांची तोडफोड करायला सुरुवात केली. त्यांनी केलेल्या तोडफोडीत पाच दुचाकी आणि तीन चार चाकी गाड्यांचं प्रचंड नुकसान झालंय.

अधिक वाचा - पिंपरी-चिंचवड महापालिकेला अच्छे दिन

दरम्यान, त्यांनी काही घरात घुसत घरातील सामानाचीही नासधुस केली. यावेळी पवार आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या दगडफेकीत काही नागरिकही जखमी झाले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.