कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांना मुंबईत हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत डॉक्टर आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक झालेतय. डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर पानसरे यांना मुंबईत हलविण्यात येत आहे. दरम्यान, पानसरे यांच्या कुटुंबीयांनी तीव्र विरोध केलाय.
गोविंद पानसरे प्रकृती स्थिर असल्याची माहीती डॉक्टरानी दिली आहे. कोल्हापूर येथे चांगले उपचार होत असताना त्यांना कशाला मुंबईला हलवायचे, असा प्रश्न कुटुंबीयांनी विचारलाय. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर पानसरे यांना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
अनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दीड वर्ष पूर्ण झाला असून अद्यापही त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. शिवाय राज्यात आणि केंद्रात एकाच सरकार आहे तरीही या प्रकरणाचा छडा लावण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
तर दुसरीकडे कोल्हापुरात कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवरही दाभोलकरांप्रमाणेच प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यालाही आता चार दिवस पूर्ण झालेत मात्र रेखाचित्र तयार करण्यापलीकडे पोलीस तपासात अन्य कोणतीही प्रगती दिसून येत नाहीये. त्यामुळे या दाभोलकरांच्या मारेकऱ्यांप्रमाणे आता पानसरेंवरील हल्लेखोरही मोकाट सुटणार का असा प्रश्न निर्माण उपस्थित करण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.