गोंदिया नगरपालिका निवडणूक, रविवारी अखेरच्या टप्प्याचं मतदान

नगरपालिका निवडणुकांच्या रणसंग्रामातील अखेरच्या टप्प्याचं मतदान येत्या रविवारी होतंय. गोंदिया आणि तिरोडा नगरपरिषद निवडणुकीसाठी होणा-या या मतदानासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.

Updated: Jan 4, 2017, 10:33 PM IST
गोंदिया नगरपालिका निवडणूक,  रविवारी अखेरच्या टप्प्याचं मतदान  title=

गोंदिया : नगरपालिका निवडणुकांच्या रणसंग्रामातील अखेरच्या टप्प्याचं मतदान येत्या रविवारी होतंय. गोंदिया आणि तिरोडा नगरपरिषद निवडणुकीसाठी होणा-या या मतदानासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.

गोंदिया नगरपरिषदेतील 42 नगरसेवक, एक नगराध्यक्ष आणि तिरोडा नगरपरिषदेतील 17 नगरसेवक तसंच एका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 8 जानेवारीला मतदान होतंय.. मतदानाची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतशी प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचाराचा धडाका लावलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही निवडणूक प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. 

गोंदिया आणि तिरोड्यात राष्ट्रवादीचे उमेदवार आणि नगराध्यक्ष निवडून देण्याचं आवाहन पटेल यांनी मतदारांना केलंय.. तर भाजपकडून या निवडणुकांची जबाबदारी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या खांद्यावर टाकण्यात आलीय. भाजपचाच नगराध्यक्ष निवडून येईल असा विश्वास बडोले यांनी व्यक्त केलाय. 

यंदा पहिल्यांदाच या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीत सर्व प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढतायत. संपूर्ण राज्याच लक्ष गोंदिया आणि तिरोडा नगरपरिषदेच्या निकालाकडे आहे. मागील वर्षी तिरोडा नगर परिषदेत राष्ट्रवादीची आणि गोंदिया नगर परिषदेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळं आता या ठिकाणी सत्ता परिवर्तन होतं की मतदार याच पक्षांना कौल देणार हे 9 जानेवारीला स्पष्ट होईल.