गोकुळ दूध महागले, १ जुलैपासून दरवाढ

मुंबईकरांनो आता गोकुळ दुधासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.  

Updated: Jun 25, 2016, 02:25 PM IST
गोकुळ दूध महागले, १ जुलैपासून दरवाढ title=

कोल्हापूर : मुंबईकरांनो आता गोकुळ दुधासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण कोल्हापूर जिल्हा सहकरी दूध संघाने गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गाय आणि म्हशीच्या दूध दरात वाढ करण्यात येणार आहे.

दोन रुपयांची ही वाढ असेल. १ जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात १ रुपया ७० पैसे आणि गायीसाठी १ रुपया ३० पैसे वाढीचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे विक्री दरातही वाढ होणार आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने दोनच दिवसांपूर्वी घेतला होता. त्यामुळे विक्री दरातही वाढ होणार हे गृहितच होते. परंतु त्यातही संघाने सरसकट गाय आणि म्हैस दूधासाठी दोन रुपये वाढ केली. नव्या दरानुसार मुंबईत आता म्हैस दूधासाठी लिटरला ५३ रुपये तर गाय दुधासाठी ४१ रुपये मोजावे लागणार आहेत. 

दरम्यान, त्याआधी अमूलने अर्धा लिटरला दोन रुपये आणि एका लिटरला एक रुपया दरवाढ केली होती. अमूलनंतर आता गोकुळ दूध दरवाढ झाल्याने गृहीनींचे बजेट कोलमडणार आहे.