पुण्यातील मोदींच्या स्मार्ट सिटी योजना कार्यक्रमावर राष्ट्रवादी, शिवसेनेचा बहिष्कार

स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमाला अखेर पुण्याचे महापौर प्रशांत जगताप हे हजर रहाणार आहेत. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे.

Updated: Jun 25, 2016, 02:11 PM IST
पुण्यातील मोदींच्या स्मार्ट सिटी योजना कार्यक्रमावर राष्ट्रवादी, शिवसेनेचा बहिष्कार title=

पुणे : स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमाला अखेर पुण्याचे महापौर प्रशांत जगताप हे हजर रहाणार आहेत. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे.

स्मार्ट सिटी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. याबाबत महापौर जगताप यांच्याशी चर्चा करुन त्यांनी कार्यक्रमत सहभागी होण्याची विनंती केल्यानंतर महापौरांनी या कार्यक्रमाला उपस्थीत रहाण्याबाबत सहमती दर्शवली आहे. 

पुणे शहराची प्रतिष्ठा राखण्याच्य दृष्टीने महापौर या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे इतर नेते, नगरसेवक, पदाधिकारी मात्र कार्यक्रमाला हजर रहाणार नाहीत. तसेच शिवसेनेनेही बहिष्कार टाकलाय.

दरम्यान, भाजप आणि शिवसेना नैसर्गिक मित्र असून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांच्या नेत्यांचा आदर राखला पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलीय.. कोणाचं मन दुखावणार नाही याचीही काळजी घ्यावी असंही दानवेंनी म्हटले आहे.