पणजी : गोव्यात काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात दाखल झालेल्या विश्वजित राणे आणि निवडणुकी अगोदर भाजपात डेरेदाखल झालेल्या माविन गुदिन्हो यांना भाजपकडून मंत्रीपदे देण्यात आली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.
गोव्यात भाजपाला सत्तेसाठी आवश्यक असणारा आकडा मिळवता न आल्याने प्रादेशिक पक्षांच्या सहकार्याने सत्ता स्थापन केलेल्या भाजपने काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या दोघांना मंत्रीपदे दिली. भाजपाकडे सध्या बहुमतासाठीचा आकडा आहे. पण भाजपला अधिक मजबूत करण्यासाठी विश्वजीत राणेंची मदत होईल, असं मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यावेळी म्हणाले.