ठाणे : भिवंडीतील एका सातवी पास रिक्षाचालकाने अफलातून करामत करून दाखवली आहे. आतापर्यंत आपण वातानुकुलीत मोटार, बस वा कॅब पाहिल्या असतील मात्र, शास्त्रीनगरात राहणा-या इसाक नसीर शेख यांनी चक्क आपल्या ऑटो रिक्षामध्ये नॅचरल एसी बसवून प्रवाश्यांना गारेगार प्रवासाची अनुभूती दिली आहे.
रिक्षातील या एसीसाठी त्यांना अवघा एक हजार रुपये खर्च आला असून यासाठी कुठलेही इंधन खर्ची पडत नाही. शिवाय, रिक्षातील या थंडगार प्रवासासाठी प्रवाश्यांना कोणतेही अतिरिक्त भाडे न आकारता टेरिफप्रमाणेच दर आकारत असल्याचे त्यांनी सांगितले.
गतवर्षी त्यांनी पहिल्यांदा रिक्षात पत्रे लावून स्पंजाच्या साह्याने स्वत:साठी थंड हवेची सोय केली.हा प्रयोग यशस्वी झाल्याने यंदा त्यांनी नवा प्रयोग केला आहे. रिक्षाच्या टपवर तीन प्लास्टिकचे ‘टी’ सदृश्य झडपा बसवल्यात. त्यातून येणारी हवा रिक्षाच्या आत बसवलेल्या पत्र्याच्या पेटीतील पाण्याने भिजवलेल्या स्पंजवरून जात गारवा देते.