डोंबिवलीत कचऱ्याच्या ढिगाने मिळतेय आजाराला निमंत्रण

पावसामुळं गटारात साचललं पाणी,  जागोजागी साचलेले कच-याचे ढिग यामुळं डोंबिवली आणि त्यात समाविष्ट झालेली २७ गावं कच-याच्या समस्येनं ग्रासलीयत. त्यामुळं स्वाभाविकच रोगराई पसरलीय.

Updated: Jul 30, 2016, 08:07 AM IST
डोंबिवलीत कचऱ्याच्या ढिगाने मिळतेय आजाराला निमंत्रण title=
संग्रहीत छाया : DNA

डोंबिवली : पावसामुळं गटारात साचललं पाणी,  जागोजागी साचलेले कच-याचे ढिग यामुळं डोंबिवली आणि त्यात समाविष्ट झालेली २७ गावं कच-याच्या समस्येनं ग्रासलीयत. त्यामुळं स्वाभाविकच रोगराई पसरलीय.

ठेकेदारांना कामं देऊनंही जागोजागी कच-याचे ढीग साचलेत. डोंबिवलीतल्या सांगावं, सोनारपाडा रोड या भागांमध्ये तर घाणीच साम्राज्य आहे. डेंगु, कावीळ आणि इतर साथीच्या रोगांनी खासगी दवाखाने तेजीत आहेत. 

राजकारण्यांची सर्वच आश्वासनं फोल ठरलेली दिसतायत. पालिका याला जितकी जबाबदार आहे तितकेच नागरिकही जबाबदार आहेत. कचरा टाकू नयेच्या सुचनांचे फलक असूनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.