नागपूर : नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. मात्र, पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसल्याचा आरोप, पीडितेच्या पालकांनी केलाय.
नागपूरमधल्या जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत ही अल्पवयीन मुलगी राहते. त्याच भागातल्या तरुणांनी गुंगीचं औषध देऊन आपल्यावर बलात्कार केल्याची या मुलीची तक्रार आहे. तर पोलिसांनी आपल्याच मुलीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याचा तिच्या आईनं केलाय.
या प्रकरणी शिवसेनेचे पदाधिकारी आरिफ पटेल यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर, कारवाईची चक्र फिरलीत.
घटनेतल्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक होऊन न्याय मिळावा, ही पीडितेची मागणी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.