पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

शहरात आज सलग दुस-या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं  हजेरी लावली. सकाळपासूनच तापमानात कमालीची वाढ झालेली होती. दुपारी चार नंतर परिसरात ढगांनी गर्दी केली. 

Updated: Mar 29, 2015, 11:28 PM IST
पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस title=

पिंपरी-चिंचवड : शहरात आज सलग दुस-या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं  हजेरी लावली. सकाळपासूनच तापमानात कमालीची वाढ झालेली होती. दुपारी चार नंतर परिसरात ढगांनी गर्दी केली. 

अवघ्या पाऊण तासानंतर पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यानंतर शहरातल्याअनेक भागांत पावसान जोरदार हजेरी लावली. निगडी, पिंपरी -चिंचवड, भोसरी याठिकाणी पावसान जोरदार हजेरी लावली. 

जोरदार आलेल्या पावसामुळ रस्ते जलमय झाले. पावसाबरोबर सुटलेल्या वा-यामुळे कामावरून घरी जाणा-या चाकरमान्यांची आणिसुट्टी असल्यान घराबाहेर पडलेल्या नागरीकांची, वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.