पुणे : लाल डब्बा अशी ओळख असलेली राज्य परिवहन मंडळाची एसटी आता आधुनिक होत आहे. एसटीमध्ये आता चक्क वाय - फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ही सेवा मोफत आहे. राज्य परिवहन मंडळाच्या पुणे विभागात सध्या प्रायोगिक तत्वावर वाय फाय सुविधा देण्यात अली आहे. सध्या एसटीच्या पन्नास गाड्यामध्ये वाय - फाय सुविधा देण्यात आली आहे.
ती यशस्वी झाल्यानं लवकरच ३५० गाड्यांमध्ये वाय - फाय सुविधा देण्यात येणार आहे. डिसेंबर नंतर एसटीच्या इतर विभागातील गाड्यांमध्ये देखील वाय - फाय सुविधा दिली जाणार आहे.