जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचा गरिबांच्या रांगेत 'एक नंबर'

(विकास भदाणे, झी २४ तास, जळगाव) जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या संपूर्ण परिवाराला, वैद्यकीय सेवा देतांना वेगळा न्याय, आणि गोरगरीबांना वेगळा न्याय देण्यात आला आहे. कारण जिल्हाधिकारी रूबल यांच्या परिवाराला मोफत औषधी पुरवल्याचं समोर आलंय.

Updated: Sep 24, 2015, 04:29 PM IST
जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचा गरिबांच्या रांगेत 'एक नंबर' title=

जळगाव : (विकास भदाणे, झी २४ तास, जळगाव) जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या संपूर्ण परिवाराला, वैद्यकीय सेवा देतांना वेगळा न्याय, आणि गोरगरीबांना वेगळा न्याय देण्यात आला आहे. कारण जिल्हाधिकारी रूबल यांच्या परिवाराला औषधी पुरवल्याचं समोर आलंय.

जिल्हाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी वर्षभरात ८६ हजारांच्या औषधी
जिल्हा रूग्णालयातून जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या कुटुंबियांसाठी ८६ हजार रूपयांची औषधं देण्यात आली. सरकारी योजनेतून गोर-गरिबांनी उपलब्ध नसलेली औषधं, स्थानिक निधीतून खरेदी केली जातात, मात्र फक्त हजार रूपयांच्या आत ही औषधं असावीत असा नियम आहे. मात्र जिल्हाधिकारींच्या कुटुंबियांसाठी तब्बल ८६ हजार ५०० रूपयांच्या औषधांची खरेदी झाली.

जिल्हाधिकारी यावर कधी बोलतील?
जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांचे पती, मुलगा आणि आई-वडिलांसाठी एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या काळात ८६ हजार ७५० रूपयांच्या औषधांची खरेदी झाली. विशेष म्हणजे यात, २ मार्च २०१५ रोजी ५ वर्षाखालील मुलासाठी वापरण्यात येणारी, मेटासर्टेन नावाच्या रक्तदाबाच्या ६० गोळ्या दिल्याचा उल्लेख आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसाठी वेगळा आणि गोरगरींबासाठी वेगळा न्याय
तात्काळ उपचार कुणालाही देण्यात दुमत नाही, किंवा गैर तर अजिबातच नाही, पण जिल्हाधिकाऱ्यांसाठी वेगळा आणि गोरगरींबासाठी वेगळा न्याय का?

जिल्हाधिकाऱ्यांच्या संपूर्ण कुटुंबाला औषधं पुरवल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलं आहे. मनसेचे कार्यकर्ते दिलीप सुरवाडे यांनी माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आणली आहे.

जिल्हा रूग्णालयाकडून प्रकरणाची सारवा सारव
रूग्णालय प्रशासनाकडे याची विचारणा केली असता, ज्याला सेवा दिली जाते, त्याच्याकडे आम्ही रूग्ण म्हणून पाहतो, ज्या औषधी आपल्याकडे नाहीत, त्या आपण स्थानिक निधीतून खरेदी करतो, ती खरेदी हजार रूपयांची आत असावी असा शासनाचा आदेश आहे, असं जिल्हा रूग्णालयाचे शल्य चिकित्सक, डॉ. किरण पाटील यांनी म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.