सांगली : सांगलीतल्या बनेवाडी गावात आज एका संपूर्ण कुटुंबानं आपलं जीवन संपवल्याचं समोर आलंय.
संजय यादव आणि त्यांची पत्नी जयश्री यादव या दाम्पत्यानं गळफास लावून आत्महत्या केली. तर त्यांची मुलगी समृद्धी यादव आणि मुलगा राज्यवर्धन यादव या दोघांचेही मृतदेह सापडले आहेत.
दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळले नसले तरी सावकारीला कंटाळून आत्महत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय.