सांगली जिल्ह्यातील भीषण पूरस्थिती

जिल्ह्यात सलग चार दिवस मुसळधार पाऊस झाला आहे. कृष्णा आणि वारणा नद्याचे पाणी पात्राबाहेर आले आहे. जिल्ह्यातील ६ गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावकऱ्यांनी होड्या काढून सुरक्षित ठिकाण गाठण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Updated: Jul 12, 2016, 07:22 PM IST
सांगली जिल्ह्यातील भीषण पूरस्थिती  title=

सांगली : जिल्ह्यात सलग चार दिवस मुसळधार पाऊस झाला आहे. कृष्णा आणि वारणा नद्याचे पाणी पात्राबाहेर आले आहे. जिल्ह्यातील ६ गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावकऱ्यांनी होड्या काढून सुरक्षित ठिकाण गाठण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

पावसाचा जोर असाच सुरू राहिला, तर सकाळपर्यंत सांगलीत कृष्णेची पाणी पातळी ३६ फुटापर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शहरात आणि नदीकाठच्या गावात पूरस्थिती बिकट होण्याची शक्‍यता आहे.

सांगलीशहर
 काकानगर, कर्नाळ रोडवरील झोपडपट्टीत पाणी शिरल्याने लोकांचे स्थलांतर 

मिरज तालुका
मौजे डिग्रजचाही संपर्क तुटला 

शिराळा तालुका
वारणा नदी धोक्‍याच्या पातळीवर, कुंडलवाडी, भरतवाडी - कणेगाव व पर्वतवाडी - ऐतवडे खुर्द गावांचा संपर्क तुटला आहे. 

वाळवा तालुका
ऐतवडे खुर्द येथील दहा-पंधरा कुटुंबे सुरक्षित स्थळी हलवण्यात आलीत. कुंभार गल्ली, लोहार गल्ली येथे पुराचे पाणी शिरले. नवेखेड परिसरात कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे. कामेरीतील लष्कर तलाव ५ वर्षांनी भरला आहे.

 पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी बोटी, तसेच सर्व साधनसामग्री तयार ठेवली आहे. नदीकाठच्या गावातील तलाठी, कोतवाल, ग्रामसेवकांना मुक्कामास थांबण्याचे आदेश देण्यात आलेत.