नागपूर येथे लग्न समारंभात गोळीबार, दोघांना अटक

येथे एका लग्नमंडपातच गोळीबार झाल्यामुळं  जमलेल्या व-हाडींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. गंभीर गुन्ह्यातल्या दोन आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला.

Updated: Apr 28, 2016, 10:10 AM IST
नागपूर येथे लग्न समारंभात गोळीबार, दोघांना अटक title=

नागपूर : येथे एका लग्नमंडपातच गोळीबार झाल्यामुळं  जमलेल्या व-हाडींमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. गंभीर गुन्ह्यातल्या दोन आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला.

हे आरोपी एका लग्नमंडपात शिरले. आणि त्याच ठिकाणी त्यांनी थेट पोलिसांवर  गोळीबार केला. मात्र सुदैवानं या गोळीबारात कोणीही जखमी झालं नाही.

या दोन्ही  आरोपींना अटक करण्यात अखेर पोलिसांना  यश आलं. अविनाश नवरखेडे आणि शुभम  लोंढे अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी  आरोपिंकडून दोन पिस्तुल आणि एक सुरा जप्त केला आहे. मात्र, हा गोळीबार का केला याचे कारण समजू शकलेले नाही.