दोन भोंदू बाबांकडून २५ वर्षे लूट, वाडा येथे गुन्हा दाखल

पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडमधल्या भोंदूबाबाचं प्रकरण ताज असतानाच, आता वाडा तालुक्यातही दोन भोंदूबाबान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस त्यांचा शोध घेताहेत. 

Updated: Aug 14, 2015, 01:17 PM IST
दोन भोंदू बाबांकडून २५ वर्षे लूट, वाडा येथे गुन्हा दाखल title=

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडमधल्या भोंदूबाबाचं प्रकरण ताज असतानाच, आता वाडा तालुक्यातही दोन भोंदूबाबान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस त्यांचा शोध घेताहेत. 

वाडा तालुक्यातल्या तूसे गावातले कांतीलाल देशमुख आणि नंदकुमार देशमुख अशी या भोंदूबाबांची नावं आहेत. पंचवीस वर्षांहून जास्त काळ, दारू सोडवण्याच्या नावानं ते लोकांची लूट करत होते. 

व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाने सुरु केलेल्या त्यांच्या आश्रमात आठवड्यातून दोन दिवस राज्यासह परराज्यातूनही लोक यायचे. हे भोंदूबाबा, एका व्यक्तीकडून तीस हजार रूपये उकळायचे. 

आश्रमाजवळच त्यांचं कोट्यवधी रूपयांचं घर आणि त्या शेजारी तीन मजली वातानुकूलीत इमारत उभी केली होती. एका रुग्णानं केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.