नाशिक : नाशिकच्या साधुग्राममध्ये आज दोन गटात हाणामारी झाली. मिरवणुकीच्या परवानगी वरून हा वाद उद्भवला.
जंगलीदास महाराज यांच्या शिष्यांची औरंगाबादरोड वरून रामकुंडाच्या दिशेने मिरवणूक निघाली. मात्र साधुग्रामच्या मुख्य रस्त्यावर आल्यानंतर तीनही आणि आखाड्यांच्या साधुंनी मिरवणूक अडवून परवानगी का घेतली नाही याचा जाब विचारला त्यानंतर सुरु झालेल्या बाचाबाचीच रुपांतर हाणामारीत झालं.
यात काही भाविक किरकोळ जाखिमी झालेत तर एकदोन गाड्यांचा काचा फोडण्यात आल्यात. साधू लाठ्याकाठ्या तलवारीसह रस्त्यावर उतरल्याने महिला लहानमुलांमध्ये घबराट पसरली होती. पोलिस प्रशासनाने मिरवणुकीला परवानगी देवूनही आखाड्यांची परवानगी घेतली नसल्याचा कारणावरून हा वाद उद्भवला. अखेर पोलिसानी मध्यस्थी दुसऱ्या मार्गाने मिरवणूक मार्गस्थ करून वादावर तूर्तास पडदा टाकला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.