कल्याण : स्कायवॉकवर धंदा लावणाऱ्या एका फेरीवाल्यानं हफ्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे, हप्ते वसूल करणाऱ्या गुंडानं त्याला तिथेच मारायला सुरूवात केली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय.
कल्याणच्या स्कायवॉक हा फेरीवाल्यांचा अड्डा बनल्याचं आता काही नवीन राहिलेलं नाही. पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे स्कायवॉकचा वापर नागरिकांच्या फायद्यासाठी कमी आणि फेरीवाल्यांच्या फायद्यासाठी जास्त होतोय. हप्तेखोरीच्या याच मायाजालामुळे रविवारी रात्री फेरीवाले आणि हप्तेखोर यांच्यात तुंबळ हाणामारी झाली.
जुनेद नावाचा तरूण स्कायवॉकवर छत्र्या विकत होता. रविवारी संध्याकाळी सहा जणांची एक टोळी जुनेदकडे हप्ता मागालाय आली. पापाभाई रफिक, आवेश बाबू मुर्गी, आलार, मोईन, पप्पू शेख आणि आलम शेख अशी या सहा जणांची नावं आहेत.
जुनेदनं हप्ता नाकारल्यावर सहा गुंडांनी स्कायवॉकवर फ्री स्टाईल हाणामारी सुरू केली. त्यामुळे प्रवशांमध्येही एकच गोंधळ उड़ाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय.
झटपट पैसा मिळविण्यासाठीच काही पालिका आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने हे गुंड फेरिवाल्यांकडून हप्ते वसुली करत असल्याचा आरोप काही फेरीवाल्यांनी केलाय.