सांगली : स्त्रीभ्रूणाची निर्घृण हत्या करण्याचा धंदा करणाऱ्या नराधम डॉ बाबासाहेब खिद्रापुरेला बेळगावमधून अटक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ गावात खिद्रापुरेच्या हॉस्पिटलजवळ 19 अर्भकांचे अवशेष जमिनीत पुरलेल्या अवस्थेत सापडले. तेव्हापासून बाबासाहेब खिद्रपुरे फरार होता. अखेर मिरज ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी सोमवारी खिद्रापुरेच्या हॉस्पिटलवर छापा घातला.
तपासासाठी सांगली पोलिसांनी पाच पथकं तयार केली होती. अखेर मिरजच्या ग्रामीण पोलिसांनी बेळगावात दडून बसलेल्या खिद्रापुरेला मध्यरात्री अटक केली. म्हैसाळ कर्नाटकच्या सीमेला लागूनच असल्यानं नराधम खिद्रापुरे सहज फरार झाला होता. पण तपासाची चक्र फिरल्यावर अखेर खिद्रापुरे सापडला. आज खिद्रापुरेला कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.