नाशिक : परतीच्या पावसाने शेतक-यांची डोकेदुखी वाढवली

जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे बळीराजा समाधान व्यक्त करत असतानाच मागील आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतक-यांची डोकेदुखी वाढवलीय. पावसाने भाजीपाला तर सडलाच आहे मात्र रोग पसरण्याचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Updated: Oct 11, 2016, 12:02 AM IST
नाशिक : परतीच्या पावसाने शेतक-यांची डोकेदुखी वाढवली title=

नाशिक : जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे बळीराजा समाधान व्यक्त करत असतानाच मागील आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतक-यांची डोकेदुखी वाढवलीय. पावसाने भाजीपाला तर सडलाच आहे मात्र रोग पसरण्याचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यासह विभागात समाधानकारक पाऊस झालाय. पावसाच्या जोरावरच नाशिक विभागात 94 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून विशेषतः नवरात्रीच्या सुरूवातीला झालेल्या परतीच्या पावसाने शेतक-यांच्या मनातील धाकधूक वाढलीय. द्राक्ष, कांदा, टोमॅटो, फुलं, कारली, काकडी या पिकांचं नुकसान झालंय. 

नगर जिल्ह्यातील काही भागात झालेल्या पावसाने शेतीपिकाचं नुकसान झालंय. त्यांच्या पंचनाम्यांना सुरूवात झालीय. मात्र अजून अहवाल झालेला नाही. शेतकरी हवालदिल झाला असताना प्रशासन मात्र नुकसान फारसं चिंताजनक नसल्याचे दावे करतंय. 

शेतकरी सरकारकडे अनुदानाची, हमीभावाची मागणी करतायत. सरकारकडून मात्र फारशी गांभीर्याने दखल घेतली जात नाहीये. दसरा दिवाळी तोंडावर आली असतानाच पिकं हातची गमवायची की काय या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.