"मोदींपेक्षाही फडणवीस यांचे काम चांगलं"

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची स्तुती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी  केली आहे.

Updated: May 12, 2015, 11:09 PM IST
"मोदींपेक्षाही फडणवीस यांचे काम चांगलं" title=

लातूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची स्तुती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी  केली आहे.
 
अण्णा हजारेंनी फडणवीसांची तुलना थेट पंतप्रधान मोदी यांच्याशी केली आहे. मोदींपेक्षा फडणवीस चांगलं काम करत असल्याचं अण्णांनी म्हटलंय.

फडणवीस सरकारच्या 'सेवा हमी कायदा' तर त्यांचा सर्वोत्कृष्ट निर्णय आहे. कारण लोकांना त्यांचं काम वेळेत करुन मिळणार आहे, शिवाय न मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

राजकीय पक्षांशी मला घेणं-देणं नाही, मात्र फडणवीस सरकारचे काही निर्णय प्रशंसनीयच आहेत, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.