Exclusive – पाहा शिवरायांच्या हयातीतच जगातलं पहिलं शिल्प

छत्रपती शिवाजी महाराज यांची भारतात अनेक ठिकाणी स्मारकं आणि शिल्पं आहेत. पण शिवाजी महाराजाचं पहिलं शिल्प कुठं आणि कसं आहे? या शिल्पाची माहिती जगासमोर आणणारा झी मीडियाचा हा एक्सक्लुझीव्ह ग्राउंड रिपोर्ट..

Updated: Aug 12, 2015, 10:01 PM IST
Exclusive – पाहा शिवरायांच्या हयातीतच जगातलं पहिलं शिल्प title=

प्रताप नाईक, झी मीडिया, यादवाड, कर्नाटक  : छत्रपती शिवाजी महाराज यांची भारतात अनेक ठिकाणी स्मारकं आणि शिल्पं आहेत. पण शिवाजी महाराजाचं पहिलं शिल्प कुठं आणि कसं आहे? या शिल्पाची माहिती जगासमोर आणणारा झी मीडियाचा हा एक्सक्लुझीव्ह ग्राउंड रिपोर्ट..

कुठं आहे शिवरायाचं पहिलं शिल्प?...कुणी बांधलं महाराजांचं शिल्प?... आम्ही दाखवतोय शिवरायांचं पहिलं शिल्प ! हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज....भारतात अनेक ठिकाणी महाराजांची स्मारकं, शिल्पं आहेत... पण शिवरायाचं इतिहासातलं पहिलं शिल्प-स्मारक कुठं आणि कसं आहे याबाबत काही अभ्यासक सोडल्यास कुणालाही यासंदर्भात माहिती नाही.

कर्नाटकातल्या धारवाडच्या उत्तरेस यादवाड हे छोटंसं गाव आहे... या गावातल्या एका मंदिरात काळ्या पाषाणात महाराजांचं शिल्प कोरण्यात आलं... या शिल्पाची उंची तीन फूट आणि रुंदी अडीच फूट आहे... दोन भागात हे शिल्प विभागलं गेल, असल्याचं इतिहास संशोधक  इंद्रजीत सावंत यांनी सांगितलं.

इसवी सन 1678 मध्ये दक्षिण दिग्विजय करुन महाराष्ट्रात परत येत असताना कर्नाटकातल्या गदग प्रांतातल्या बेलवडी या छोट्या गढीस वेढा घातला.... इथल्या लढाईत मल्लाबाई देसाईनं आपल्या महिला सैन्यासह मोठ्या धैर्यानं झुंज दिली.

पतीच्या निधनानंतर मोठ्या धीरानं मराठी सैन्याशी दोन हात करणा-या मल्लाबाईला तिचं राज्य मुलांच्या दूधभातासाठी म्हणून महाराजांनी परत दिलं.  त्याचबरोबर स्वातंत्र्यासाठी लढणा-या मल्लाबाईला सावित्री म्हणून गौरवलं. शिवरायांची ही आठवण कायमस्वरुपी लक्षात रहावी म्हणून मल्लाबाईनं शिवरायांच्या हयातीतच हे जगातलं पहिलं शिल्प बनविलं.

शिवरायांच्या शिल्पाचा इतिहास यादवाडच्या ग्रामस्थांना माहित नसल्यामुळे त्याची देखभाल म्हणावी तशी होत नाही.... म्हणूनच महाराजांचं हे ऐतिहासिक शिल्प कालांतरानं नामशेष होण्याची भीती आहे...

यादवाडचे ग्रामस्थ हनुमानाच्या मंदिराबरोबर या शिल्पाची  दररोज पूजाअर्चा करतात. पण आता हनुमानाच्या मंदिर बांधकामासाठी हे शिल्प असं कोप-यात ठेवण्यात आलंय... बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे ऐतिहासिक शिल्प ग्रामस्थ पुन्हा उभं करणारेत...पण त्यासाठी ग्रामस्थांनी हनुमानाच्या मंदिराबाहेर आणि गटारीसमोर त्यांची जागा निश्चित केलीय...त्यामुळे ऐतिहासिक शिल्पाचं मोल धोक्यात आलंय...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.