निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार

महानगरपालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्शवभूमी असलेल्या अनेकांना तिकीटं मिळाली आहेत. जवळपास सर्वच पक्षांमध्ये गुन्हेगार उमेदवार आहेत. त्यातील काहींवर नजिकच्या वर्तमानकाळात तर काहींवर भूतकाळात गुन्हे दाखल झाले आहेत.

Updated: Feb 9, 2017, 09:12 AM IST
निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार title=

नागपूर : महानगरपालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्शवभूमी असलेल्या अनेकांना तिकीटं मिळाली आहेत. जवळपास सर्वच पक्षांमध्ये गुन्हेगार उमेदवार आहेत. त्यातील काहींवर नजिकच्या वर्तमानकाळात तर काहींवर भूतकाळात गुन्हे दाखल झाले आहेत.

नाशिक महापालिकेसाठी उभ्या असलेल्या सर्वच उमेदवारांची माहिती आता पोलिसांनी उपलब्ध करून दिलीय. त्यामुळे ऩाशिककरांना आता त्यांच्या प्रभागात उभ्या असलेल्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड पाहता येणार आहे. नाशिकमध्ये भाजप शिवसेना यांनी अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीटं दिली आहेत. राष्ट्रवादीचे हेमंत शेट्टी, पवन पवार हे हिस्ट्री शिटर सध्या भाजपमध्ये येऊन पावन झालेत.

मनसे आणि सेनाही यापेक्षा वेगळी नाही. हिस्ट्री शिटर असूनही राजकीय पक्षांनी अपक्ष उमेदवार उभं करून पावन करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी नोटीसा, तडीपारी करूनही राजकीय पक्ष अशा सर्वच उमेदवारांना मदत करत आहेत असंच चित्र आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी अशांचं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय.