तब्बल ९ तासांनंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक सुरळीत

तब्बल ९ तासांनंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक सुरळीत झालीय. दरड बाजूला सारण्यात आली असून मुंबईच्या दिशेनं येणारा मार्ग मोकळा करण्यात आलाय. 

Updated: Jul 19, 2015, 11:37 PM IST
तब्बल ९ तासांनंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक सुरळीत title=

पुणे: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर खंडाळा बोर घाटात आडोशी बोगद़याजवळ दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. दरम्यान, तब्बल ९ तासांनंतर मुंबई-पुणे महमार्गावरील वाहतूक सुरळीत झालीय. दरड बाजूला सारण्यात आली असून मुंबईच्या दिशेनं येणारा मार्ग मोकळा करण्यात आलाय. 

सदर दरडीसोबत खाली मार्गावर आलेल्या दगडगोट़यांमध्ये दोन वाहनं सापडल्यानं वाहनातील ३ जण ठार झाले तर अन्य तीन जण जखमी झाले. या जखमींमधील दोन जनांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत असून या सर्वांना निगडी इथल्या लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, तिथं बचावाचं काम करण्यासाठी गेलेल्या स्थानिक बचावपथकातील एका युवकाला विरूध्द दिशेनं येणाऱ्या एका भरधावर कारनं उडविल्यानं त्याचाही म्रृत्यू झाला आहे. 

सार्वजनिक बांधकाम व उपक्रम राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी एक्स्प्रेस हायवेच्या सर्वेक्षणाचं काम एका स्विस कंपनीला देण्यात आल्याचं सांगत भविष्यात अशा घटना भविष्यात घडणार नाही असं सांगितलंय. महिन्याभरापूर्वी खंडाळ्याजवळ अशीच घटना घडली होती. त्यावेळी ३० तास वाहतूक ठप्प झाली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.