मुरबाड- म्हसा रोडवर सिलेंडरच्या ट्रकला आग, भीषण स्फोट

 मुरबाड- म्हसा रोडवर भीषण दुर्घटना घडली आहे.  बाटलीचीवाडी गावाजवळ गॅस सिलिंडरच्या ट्रकला आग लागली. या आगीमुळं ट्रकमधील सिलिंडरचे भीषण स्फोट झाले. एकामागोमाग एक बॉम्बस्फोटासारखे सिलेंडरचे स्फोट होत आहेत. जवळपास ४५० सिलेंडर फुटले आहेत.

Updated: Nov 25, 2014, 12:03 AM IST
मुरबाड- म्हसा रोडवर सिलेंडरच्या ट्रकला आग, भीषण स्फोट  title=

ठाणे:  मुरबाड- म्हसा रोडवर भीषण दुर्घटना घडली आहे.  बाटलीचीवाडी गावाजवळ गॅस सिलिंडरच्या ट्रकला आग लागली. या आगीमुळं ट्रकमधील सिलिंडरचे भीषण स्फोट झाले. एकामागोमाग एक बॉम्बस्फोटासारखे सिलेंडरचे स्फोट होत आहेत. जवळपास ४५० सिलेंडर फुटले आहेत.

एका मागोमाग एक सिलेंडर फुटत असल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेमुळं आजुबाजूची गावं रिकामी कऱण्यात आली आहेत.

या ट्रकमधील सिलेंडर भरलेले होते की रिकामे याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र रिकाम्या सिलेंडरमध्येही थोडा जरी गॅस शिल्लक असला, तरी त्याचा स्फोट होऊ शकतो. दरम्यान, आग विझवण्याचं काम सुरू आहे. मात्र आग कशामुळं लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.