सोशल मीडियावर खडसे आक्रमक

वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या एकनाथ खडसेंचे समर्थक आता सोशल मीडियावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. 

Updated: Aug 12, 2016, 11:30 PM IST
सोशल मीडियावर खडसे आक्रमक  title=

जळगाव  : वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या एकनाथ खडसेंचे समर्थक आता सोशल मीडियावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. 

खडसे  समर्थकांनी स्थानिक वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर विरोधकांचा समाचार घेण्यासाठी जोरदार अभियान सुरू केले आहे. दाऊदशी फोनवरून संभाषण प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांनीच रसद पुरवली असल्याच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या आहेत. 

या बातम्या खडसे सर्मथकांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. इतकच नव्हे तर काही संभाषणाच्या किल्प्सही व्हायरल करण्यात आल्या आहेत. 

एकीकडे पक्षातील विरोधकांचं समाचार खडसे समर्थक घेत असताना अंजली दमानिया यांच्याविरोधातही विविध तालुक्यांच्या न्यायालयांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. 

यासंदर्भात खडसेंचे कट्टर समर्थक आणि धुळे जिल्ह्याचे भाजपचे माजी अध्यक्ष सुनील नेरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र बोलण्यास नकार दिला.