पोलिसांना उचलावी लागली डीवायएसपींची पालखी

राज्याची कायदा आणि सुव्यवस्था झिंगल्याचं चित्र आहे. कारण अमरावतीचे डीवायएसपी नितीन जुवेकर यांना झिंगलेल्या अवस्थेत पोलिस गाडीतून नेतांनाचा व्हिडीओ झी मीडियाच्या हाती आला आहे.

Updated: Jan 19, 2015, 07:40 PM IST
पोलिसांना उचलावी लागली डीवायएसपींची पालखी title=

अमरावती : राज्याची कायदा आणि सुव्यवस्था झिंगल्याचं चित्र आहे. कारण अमरावतीचे डीवायएसपी नितीन जुवेकर यांना झिंगलेल्या अवस्थेत पोलिस गाडीतून नेतांनाचा व्हिडीओ झी मीडियाच्या हाती आला आहे.

अमरावतीचे बिनतारी संदेश विभागाचे पोलिस उपअधिक्षक नितीन जुवेकर यांची पालखी करून पोलिस त्यांना गाडीने नेत असल्याचं चित्र आहे. नितिन जुवेकर हे व्हिडीओत प्रथमदर्शनी झिंगल्याचे दिसून येत आहेत. 

कार्यालयात काय चाललंय, हे पाहणं दूर त्यांना चालताही येत नसल्याचं चित्र आहे. नितिन जुवेकर यांची अवस्था अशी अनेक वेळा होत असल्याचं काहींनी म्हटलंय.

एकंदरीत नितिन जुवेकर यांची ही परिस्थिती पाहता, पोलिस अधिकारीच असं वागत असतील, तर इतरांना काय न्याय मिळणार हा प्रश्न आहे.

गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी या प्रकरणी दारूबंदी कायद्याप्रमाणे नितिन जुवेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.