'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका'

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना दिले आहेत. 

Updated: Mar 13, 2017, 10:59 PM IST
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका' title=

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना दिले आहेत. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी हे वक्तव्य केलं आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकांवेळी जाहिरनाम्यामध्ये भाजपनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन दिलं होतं. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करता मग महाराष्ट्रात का नाही, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला होता. तसंच कर्जमाफी केली तर फडणवीस सरकारला पाठिंबा देऊ, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.