डॉन अरुण गवळी पॅरोलवर कारागृहातून बाहेर

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डॉन अरुण गवळी 12 दिवसाच्या पॅरोलवर कारागृहातून बाहेर आला. 

Updated: Oct 21, 2016, 06:04 PM IST
डॉन अरुण गवळी पॅरोलवर कारागृहातून बाहेर title=

नागपूर : शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डॉन अरुण गवळी 12 दिवसाच्या पॅरोलवर कारागृहातून बाहेर आला. 

पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी अरुण गवळीला ही रजा मंजूर करण्यात आली. पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी यापूर्वी अरुण गवळीचा रजेचा अर्ज विभागीय आयुक्तांनी अमान्य केला होता. त्यानंतर अरुण गवळीनं मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठात रजेसाठी रीट याचिका दाखल केली होती. 

याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं अरुण गवळीला २१ ऑक्टोबर ते २ नोवेंबर पर्यंतची अभिवचन रजा  मंजूर केली. २५ ऑक्टोबरला गवळीच्या पत्नीवर मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहे. मात्र, यादरम्यान गवळीला आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागेल.