डोंबिवलीतल्या स्फोटानंतर आता चोरट्यांचा उच्छाद

एमआयडीसीत गुरुवारी झालेल्या स्फोटाच्या दुष्परिणामांमधून डोंबिवलीकर अद्यापही सावरू शकलेले नाहीत. 

Updated: May 29, 2016, 02:50 PM IST
डोंबिवलीतल्या स्फोटानंतर आता चोरट्यांचा उच्छाद title=

डोंबिवली : एमआयडीसीत गुरुवारी झालेल्या स्फोटाच्या दुष्परिणामांमधून डोंबिवलीकर अद्यापही सावरू शकलेले नाहीत. 

प्रोबेस कंपनीत झालेल्या या स्फोटानं आजूबाजूच्या अनेकांना आपली घरं तशीच सोडून बाहेर जावं लागलं. पण नेमका त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी हात साफ केलाय. 

स्टार कॉलनी आणि गणेश नगर भागात 20 पेक्षा अधिक घरफोड्या झाल्याची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलीय. 

दरम्यान, या स्फोटातील मृतांची संख्या १२ वर पोहोचलीये. तसेच कंपनीत झालेला स्फोट हा बॉयलरचा नसून केमिकल रिअॅक्टरचा झाल्याचं स्पष्ट झालंय. महाराष्ट्र सरकारचे डायरेक्टर ऑफ स्टीम बॉयलरच्या निरीक्षणानंतर हे स्पष्ट झालंय.