डोंबिवलीही येणार मेट्रोच्या मॅपवर

डोंबिवलीही आता मेट्रोच्या मॅपवर येणार आहे. तळोजा- डोंबिवली- कल्याण अशा मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला आदेश दिलेत.

Updated: Oct 21, 2016, 06:36 PM IST
डोंबिवलीही येणार मेट्रोच्या मॅपवर  title=

मुंबई : डोंबिवलीही आता मेट्रोच्या मॅपवर येणार आहे. तळोजा- डोंबिवली- कल्याण अशा मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला आदेश दिलेत. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन डोंबिवलीला मेट्रोच्या मॅपवर आणण्याची मागणी केली.

त्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ एमएमआरडीएला हे आदेश दिलेत. कल्याण भिवंडी ठाणे मेट्रोसोबतच हा प्रकल्पही हाती घेण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवसांपूर्वी जाहीर केलेला ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो प्रकल्प हा केवळ बिल्डर लॉबीसाठी जाहीर करण्यात आल्याची बोचरी टिका मनसेने केली आहे.