परभणी शहरात कुत्र्याचा सात ते आठ जणांना चावा

परभणी शहरातील सुभाष रोड परिसरात रात्री कुत्र्यानं सात ते आठ जणांना चावा घेतलाय. त्यामुळं या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण  पसरलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 1, 2017, 02:20 PM IST
परभणी शहरात कुत्र्याचा सात ते आठ जणांना चावा title=

परभणी : परभणी शहरातील सुभाष रोड परिसरात रात्री कुत्र्यानं सात ते आठ जणांना चावा घेतलाय. त्यामुळं या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण  पसरलंय.  रात्री आठ ते दहाच्या दरम्यान अचानक एका कुत्र्यानं येजा करणाऱ्या लोकांवर हल्ला करत चावा घ्यायला सुरवात केली अचानक झालेल्या या प्रकारामुळे पळापळ झाली. 

जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींवर परभणीच्या सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले.  परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत पसरलीय. या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पालिकेनं मार्गी लावणं गरजेचं बनलं आहे.