सांगलीतल्या डॉ. कुलकर्णी दाम्पत्य हत्याप्रकरणी ३अटकेत

सांगलीच्या इस्लामपूर डॉक्टर दाम्पत्य हत्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलीय. इस्लामपूर पोलिसांनी मध्यरात्री ही अटक केलीय. 

Updated: Dec 27, 2015, 10:08 AM IST
सांगलीतल्या डॉ. कुलकर्णी दाम्पत्य हत्याप्रकरणी ३अटकेत title=

इस्लामपूर : सांगलीच्या इस्लामपूर डॉक्टर दाम्पत्य हत्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलीय. इस्लामपूर पोलिसांनी मध्यरात्री ही अटक केलीय. 

हॉस्पिटलमधील नर्स सीमा यादव, निलेश दिवाणजी आणि अर्जुन पवार या तिघांना अटक करण्यात आलीय. १९ डिसेंबरला रात्री प्रख्यात फिजिशियन डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि त्‍यांच्‍या पत्‍नी स्‍त्री रोगतज्‍ज्ञ डॉक्टर अरुणा कुलकर्णी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

शहरातील जावडेकर चौकात राहणाऱ्या कुलकर्णी दाम्पत्यावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. प्रकाश कुलकर्णी यांचा मृतदेह बेडरुमध्ये तर पत्नी अरुणा कुलकर्णी यांचा मृतदेह किचनमध्ये आढळून आला होता.. या दुहेरी हत्याकांडानं सांगली हादरलं होतं.