5 वर्षाच्या चिमुरड्याची गगन भरारी

 मूर्ती लहान असली तरी भल्याभल्यांना चकित करणारी कामगिरी.

Updated: Dec 26, 2015, 11:20 PM IST
 5 वर्षाच्या चिमुरड्याची गगन भरारी title=

चंद्रपूर : पाच वर्षाचा शिशिर कामडी याची मूर्ती लहान असली तरी त्यांची कामगिरी मात्र भल्याभल्यांना चकित करणारी आहे. जमिनीला अगदी चिकटून अतिशय अवघड लिम्बो स्केटिंग शिशिरनं य़शस्वीरित्या पार केलीय.

शिशिरनं जमिनिपासून अवघ्या 16 पॉईंट 2 सेंटीमीटर म्हणजेच सुमारे अर्धा फूट इतक्या कमी उंचीच्या रॉडखालून स्केटिंग करत 10 मीटरचं अंतर कापलं. ही कामगिरी साधण्यासाठी लहानग्या शिशीरनं चिकाटीपूर्ण मेहेनत घेतली. 

शिशीरची ही विक्रमी कामगिरी पाहण्यासाठी चंद्रपुरातली अनेक नामवंत मंडळी हजर होती. जेमतेम पाच वर्षांच्या शिशिरच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. त्याच्या या विक्रमाची नोंद आता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी यासाठी त्याला शुभेच्छा.