घटस्फोटाचे कारण...मुल न होऊ देणं

दोघांनी कमवायचं.. मुलं होऊ द्यायची नाहीत. गेल्या काही वर्षांमध्ये शहरांमध्ये फोफावलेली ही नवी विवाह-संस्कृती आता तिचे खरे रंग दाखवू लगाली आहे. अशा पद्धतीनं करारबद्ध लग्न करणाऱ्यांमध्ये आपापसात न पटण्याचं प्रमाण वाढतंय. वेळीच उपाययोजना केली नाही, तर ते आणखी वाढणार आहे. 

Updated: Jan 21, 2016, 11:22 PM IST
घटस्फोटाचे कारण...मुल न होऊ देणं title=

ठाणे : दोघांनी कमवायचं.. मुलं होऊ द्यायची नाहीत. गेल्या काही वर्षांमध्ये शहरांमध्ये फोफावलेली ही नवी विवाह-संस्कृती आता तिचे खरे रंग दाखवू लगाली आहे. अशा पद्धतीनं करारबद्ध लग्न करणाऱ्यांमध्ये आपापसात न पटण्याचं प्रमाण वाढतंय. वेळीच उपाययोजना केली नाही, तर ते आणखी वाढणार आहे. 

ड्युएल इन्कम... नो किड्स... किंवा डिंक... साधारणतः 1980च्या दशकात पाश्चात्य देशांमध्ये आलेलं हे फॅड कालांतरानं भारतातही आलं. नवरा-बायको दोघांनीही कमवायचं, मुलं होऊ द्यायची नाहीत.

मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो शहरांमध्ये गेल्या दशकभरात हे लोण आलं... मात्र आता त्याचे दुष्परिणाम दिसू लागलेत... मुलं नाहीत आणि दोघंही आपापल्या उद्योगात दंग यामुळे अनेक लग्नं मोडू लागलीयेत... अशा जोडप्यांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण 25 ते 30 टक्के झालंय... याची विविध कारणं आहेत...

दोघांपैकी एकाला, विशेषतः नवऱ्याला मुल व्हावं असं वाटू लागणं हे यातलं मुख्य कारण आहे. तसंच दोघांची करिअर वेगळी असल्यामुळे संवाद तुटतो, कमी होतो. काही प्रकरणांमध्ये अजिबातच मुल नको, असं दोघांपैकी एकाला वाटू लागलं..

लहान मुलाचं बंधन नसल्यामुळे संसार सहज मोडता येतो. मुलं ही जबाबदारी नसून आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, असा विचार जोडप्यांनी करायला हवा, असं मत डॉक्टरांपासून वकिलांपर्यंत सर्वांनीच व्यक्त केलंय. एकत्र कुटुंबात राहणंही एक चांगला उपाय असल्याचं तज्ज्ञ मानतात... 

आजच्या तरुण पिढीलाही डिंक पद्धतीमध्ये दोष असल्याचं वाटतंय. मुलं ही देवाघरची फुलं असं पूर्वी म्हटलं जायचं... स्वतःला मौजमजा करता यावी, यासाठी ही फुलं उमलूच न देणं आपल्यालाच महागात पडू शकतं एवढंच डिंक पद्धतीनं लग्न करणाऱ्यांनी लक्षात ठेवायला हवं.