नालासोपाऱ्यात गरोदर महिलेचा हुंडाबळी

 येथील संतोषभुवन इथं गरोदर महिलेचा हुंडाबळी गेलाय. संजीवनी जाधव असं या विवाहितेचं नाव आहे. 

Updated: Jan 21, 2016, 11:01 PM IST
नालासोपाऱ्यात गरोदर महिलेचा हुंडाबळी title=

नालासोपारा :  येथील संतोषभुवन इथं गरोदर महिलेचा हुंडाबळी गेलाय. संजीवनी जाधव असं या विवाहितेचं नाव आहे. 

तिला भाजलेल्या अवस्थेत वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालाय दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिचा मृत्यू झाला. तिचा पती अभिजितही १० टक्के भाजलाय. त्याच्यावर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत. 

संजीवनीची आई नूरजहाँ शेख यांनी अभिजितनंच आपल्या मुलीला जाळल्याचा आरोप केला. तसंच यापूर्वी एका नर्ससोबत त्याचे संबंध होते. तिचाही अभिजितनं गैरफायदा घेतल्याचं शेख यांचं म्हणणं आहे.

दोन वर्षांपूर्वी २० जानेवारीलाच या दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यांना वैष्णवी नावाची १ वर्षाची मुलगी आहे. तसंच घटना घडली त्यावेळी संजीवनी ८ महिन्यांची गरोदर होती.