नागपूर: नागपूरमधल्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
यापूर्वी दीक्षाभूमीला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून दर्जा देण्यात आला होता. गेल्यावर्षी बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती वर्षनिमित्तानं दीक्षाभूमीच्या विकासाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आंबेडकरांच्या 125 व्या जयंती वर्षात घेतला गेलेला हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय मानला जातोय.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लक्षावधी अनुयायांसह, नागपुरातल्या याच ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून हे स्थळ देशासह जगभरातल्या बौद्धधर्मीयांसाठी विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं.