पुणे : जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडजवळ दिघी परिसरात टेकडीवर सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना सात बॉम्ब आढळले. नागरिकांनी ते लष्कराच्या ताब्यात दिल्यान मोठा अनर्थ टळला.
हे बॉम्ब हे लष्कराच्या दारुगोळा कारखान्याचे असून चाचणीवेळी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ते तिथेच राहिले होते. सापडलेल्या वस्तू बॉम्ब नसल्याचं पोलीस नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात येत आहे.
मात्र या भागातल्या नागरिकांमध्ये झालेल्या प्रकारामुळं घबराहट पसरलीय. असाच हलगर्जीपणा झाला तर त्याची मोठी किंमत सर्वसामान्यांना मोजावी लागेल, असे स्थानिकांनी म्हटले आहे.