इंदापूर : मुख्यमंत्री झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीसांची नाळ कशी सर्वसामान्यांशी जोडली गेलीय याचा नुकताच प्रत्यय आलाय. नेमकं काय झालंय पाहूयात आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून.
सुरक्षेचा फौजफाटा आणि कार्यकर्त्यांच्या मांदियाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नरसिंहपूरमध्ये चक्क एका टपरीवर चहा पिऊन चहावाल्याचा मान राखला. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच कुलदैवता लक्ष्मी नृसिंहाच्या मंदिरात आले होते. ज्या ज्या वेळी फडणवीस कुलदैवताच्या दर्शनाला येतात त्या त्या वेळी ते मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या दशरथ राऊत यांच्या चहाच्या स्टॉलवर येऊन विसावा घेतात आणि त्यांनी बनवलेला चहा घेऊन फ्रेश होतात.
पण आता मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस साहेब आपल्या हातचा चहा घेतील का असा प्रश्न पडला होता. त्याचं कारणही तसंच होतं. कारण मुख्यमंत्र्यांच्या चोहोबाजूला कडेकोट बंदोबस्त होता... दरवेळसारखाच यावेळीही दशरथ पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना चहा घेण्याचा आग्रह केला. आणि मुख्यमंत्र्यांनीही हे प्रेमळ आमंत्रण स्वीकारलं आणि चहाचा आस्वाद घेतला. मुख्यमंत्री झाल्यानंतरही आपल्या प्रेमळ आग्रहाखातर त्यांनी चहा घेतल्याचा आनंद दशरथ पाटलांच्या चेह-यावर दिसून येत होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.