दीपक केसरकर अखेर शिवसेनेत दाखल

राष्ट्रवादीचे नाराज आमदार दीपक केसरकर अखेर शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित, अखेर दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Updated: Sep 18, 2014, 05:02 PM IST
दीपक केसरकर अखेर शिवसेनेत दाखल title=

सावंतवाडी : राष्ट्रवादीचे नाराज आमदार दीपक केसरकर अखेर शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित, अखेर दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

नारायण राणे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत बंडाचे झेंडे फडकवल्यानंतर, दीपक केसरकर यांच्यावर राष्ट्रवादीने कारवाई केली होती.

राष्ट्रवादीच्या कारवाईनंतर आपण शिवसेनेत जाणार असल्याचे संकेत त्याचवेळी दीपक केसरकर यांनी दिले होते.

लोकसभेचे काँग्रेस उमेदवार निलेश राणे यांचा पराभव झाल्यानंतर, दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली होती.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता कोकणात नारायण राणे आणि दीपक केसरकर संघर्ष अधिक वाढण्याची चिन्हं आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.