राज्यभरात आजपासून डान्सबारला मोकळं रान...

मुंबई : मुंबईसह राज्यभरात आज म्हणजे मंगळवारपासून पुन्हा एकदा डान्स बारमधील छमछम सुरू होणार आहे.

Updated: Mar 15, 2016, 09:02 AM IST
राज्यभरात आजपासून डान्सबारला मोकळं रान... title=

मुंबई : मुंबईसह राज्यभरात आज म्हणजे मंगळवारपासून पुन्हा एकदा डान्स बारमधील छमछम सुरू होणार आहे. बार मालकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना राज्य सरकारने बार मालकांना १५ मार्चपर्यंत परवाने द्यावे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. 

यापूर्वी महाराष्ट्र सरकाने सादर केलेल्या एका प्रतिज्ञापत्रात डान्स बारमध्ये सीसीटीव्ही लावून त्याचे थेट प्रक्षेपण जवळच्या पोलीस ठाण्यात केले जावे अशी विनंती राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केली होती.

या सीसीटीव्हीच्या माध्यमातून डान्स बारमध्ये कोणत्या अप्रिय घटना तर गडत नाहीत यावर लक्ष ठेवणे शक्य होईल असा त्यामागील युक्तिवाद होता. डान्स बार मालकांनी या निर्णयाला विरोध केला होता. राज्य सरकारची ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.