ज्येष्ठ समीक्षक द भि कुलकर्णी यांचं निधन

ज्येष्ठ समीक्षक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांचं निधन झालंय. 

Updated: Jan 27, 2016, 01:32 PM IST
ज्येष्ठ समीक्षक द भि कुलकर्णी यांचं निधन title=

पुणे : ज्येष्ठ समीक्षक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांचं निधन झालंय. 

गेल्या काही दिवसापासून पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात द. भी. यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते ८१ वर्षांचे होते. 

मराठी साहित्यच्या क्षेत्रात द. भि. यांच्या समक्षीणानं नवी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या समक्षीचा गौरव करताना विदर्भ साहित्य संघानं त्यांना साहित्य वाचस्पतीची उपाधी प्रदान केली होती. 

मराठी वाड.मयाचा इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. द. भि. यांनी केलेली कवितांची विशेषतः मर्ढेकरांच्या कविताची समीक्षाही गाजली.

साहित्यसंपदा

कथासंग्रह - रेक्वियम

ललित लेखसंग्रह – मेघ, मोर आणि मैथिली 

समीक्षापर लेखन – दुसरी परंपरा, महाकाव्य : स्वरूप आणि समीक्षा, ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद, पहिली पंरपरा, तिसऱ्यांदा रणांगण, चार शोधनिबंध, पार्थिवतेचे उदयास्त, नाटय़वेध, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र, प्रतीतिविश्रांती, युगास्त्र, द्विदल, पहिल्यांदा रणांगण, अपार्थिवाचे चांदणे, मर्ढेकरांची अनन्यता