सांगलीत मगरीच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू

 कृष्णा नदीच्या काठी मगरीची दहशत आहे. मगरीच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झालाय. त्यामुळे पुन्हा एकदा इथल्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 

Updated: Apr 21, 2015, 08:09 PM IST

सांगली : कृष्णा नदीच्या काठी मगरीची दहशत आहे. मगरीच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झालाय. त्यामुळे पुन्हा एकदा इथल्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 

सांगलीतलं कृष्णा नदीचं हे पात्र मगरींच्या वास्तव्यामुळे ग्रामस्थांसाठी घातक बनत चाललंय. गेल्या काही काळात तिस-यांदा मगरीकडून हल्ला झाल्यामुळे परिसरात भितीचं वातावरण आहे. 

सोमवारी जिल्ह्यातल्या चोपडेवाडी इथं अजय यादव नावाच्या १३ वर्षीय मुलाचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यामुळे इथल्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. वीस दिवसांपूर्वी भिलवडी इथं ऊस तोड मजुरावर मगरीनं हल्ला केला होता. तर रत्नप्रभा नावाच्या महिलेवर हल्ला करत तिच्या पायाचे बोट मगरीनं तोडलं होतं. 

मगरीच्या अस्तित्वाबाबत ग्रामस्थांनी अनेकदा वन विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र अशा कुठल्याही तक्रारी मिळालं नसल्याचं वनक्षेत्रपाल सांगतात. आत्तापर्यंत मगरीच्या हल्ल्यात दोघांचा जीव गेलाय. तर एकीच्या जीवावर बेतलंय. मात्र तरीदेखील प्रशासनानं याची कुठलीही गंभीर दखल घेतलेली नाही. प्रशासनाला खरोखरंच नागरिकांचा जीव महत्त्वाचा वाटत असेल तर लवकरात लवकर नदीपात्रातून मगरींचं बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.