पुणे : शेतकऱ्यांचे नेते, आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्यावर पुण्यातील वैकुठं स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यविधीपूर्वी शरद जोशी यांचं पार्थिव डेक्कनजवळ नदीपात्रात, सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत त्यांचं अंतिम दर्शन घेता येणार आहे. यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे, बेडेकर पूल, अलका टॉकीज अशी ही अंत्ययात्रा असणार आहे.
खूप साऱ्या शेतकऱ्यांना आणि संघटनेच्या महिलांना त्यांचं अंतिम दर्शन घेण्याची इच्छा होती, म्हणून त्यांच्या इच्छेनुसार त्यांना अंतिम दर्शनाची सोय करण्यात आली आहे. शरद जोशी यांच्या दोन्ही कन्या परदेशातून परतल्या आहेत.
माझ्या वडिलांना शेतकऱ्यांविषयी खूप प्रेम वाटायचं, त्यांना गरीबांविषयी खूप प्रेम होतं, शेतकऱ्यांवर नियम लादले जातात, म्हणून ते गरीब राहतात, असं ते नेहमी म्हणत, ज्या दिवशी शेतकऱ्यांची गरीबी नष्ट होईल, तेव्हा त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं, शरद जोशी यांच्या कन्या डॉ.श्रेया शहाणे यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.