अखेर स्मशानभूमीत त्यांचं लग्न लावलं, पण..

मनापासून एकमेकांवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना समजून घ्यायला आजचा समाज अजूनही परिपक्व नाही. कारण प्रेमातही त्यांना एवढं छळण्यात आलंय की, संपूर्ण घटना ऐकल्यानंतर तुम्हाला खालील ओळी आठवतील....

Updated: Jul 22, 2015, 08:26 PM IST
अखेर स्मशानभूमीत त्यांचं लग्न लावलं, पण..  title=

बेळगाव : मनापासून एकमेकांवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना समजून घ्यायला आजचा समाज अजूनही परिपक्व नाही.

कारण प्रेमातही त्यांना एवढं छळण्यात आलंय की, संपूर्ण घटना ऐकल्यानंतर तुम्हालाही खालील ओळी आठवतील....

"इतकेच मला जातांना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते".

रितसर लग्नाचा निर्णय घेतला, मात्र
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील इस्लामपूर गावातील, इरगौडा मालगौडा पाटील आणि वडगावच्या संगीता ताळूकर यांच्यात प्रेम जुळले. इरगौडा आणि संगीता यांनी रितसर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
मात्र या लग्नाला दोन्हीकडील कुटुंबाचा विरोध होता, म्हणून या प्रेमीयुगुलाने अखेर एका लॉजवर एकाच दोरीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येनंतर पालकांनी म्हटलंय, माहितं नव्हतं ते आत्महत्या करतील, नाहीतर लग्न लावून दिलं असतं

'चोरांच्या मनात अंधश्रद्धेचं चांदणं'
पोस्टमॉर्टमनंतर दोन्ही मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आले, यावेळी कधीही एकत्र न येणार नातेवाईक एकत्र बसले, चर्चा झाली, प्रेमासाठी त्यांनी सोबत आत्महत्या केली आहे, म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले, तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही, असं 'चोरांच्या मनात अंधश्रद्धेचं चांदणं' दिसू लागलं.

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
दोन्ही मृतदेह एकाच चितेवर ठेवण्यात आले. हळदी-कुंकू आणि फुले वाहिली. अगरबत्ती लावून पानसुपारीचा विडाही ठेवला. यानंतर अक्षता टाकून दोघांचा विवाह झाल्यासारखे सोपस्कार पार पाडण्यात आले. यानंतर मुलीचे वडील आणि मुलाचा मोठा भाऊ या दोघांनी एकाच वेळेस प्रेमीयुगुलांना अग्नी दिली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.