स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई: मॅगीचं प्रकरण ताजं असतानाच आता इतर खाद्यपदार्थांसोबतच औषधही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. नवी मुंबईतच त्याची प्रचिती आली आहे.
माणसाला जीवदान देणाऱ्या औषधामध्येच चक्क काच सापडल्याचा प्रकार पनवेलमध्ये घडला आहे. लॅपिन कंपनीची ही अँटी बायोटिक्स औषधाची बाटली आहे. या सीलबंद बाटलीमध्ये काचेचा तुकडा असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. श्याम अंबर्दे यांनी एका मेडिकल स्टोअरमधून ही औषधाची बाटली विकत घेतली होती.
तर खारघरमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोवर्धन कंपनीच्या चीजमध्ये अक्षरशः बँडेज सापडलं आहे. खारघरमधल्याच एका दुकानातून कल्पना शेळके यांनी हे चीज खरेदी केलं होतं. हे चीज खाल्ल्यानं कल्पना यांच्या मुलाला उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला.
या दोन्ही प्रकारणांमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या विभागाने या दोन्ही वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. मात्र या प्रकरणी दोषींवर अजून ठोस कारवाई मात्र झालेली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.