जोडप्याला मारहाण 'सीसीटीव्ही'त कैद

पबमध्ये बिल देण्यावरून झालेल्या वादात एका तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली असतानाच, क्षुल्लक कारणावरून एका  जोडप्याला मारहाण केल्याची घटना नागपुरात घडली आहे. 

Updated: Nov 21, 2016, 08:17 PM IST
जोडप्याला मारहाण 'सीसीटीव्ही'त कैद title=

नागपूर : पबमध्ये बिल देण्यावरून झालेल्या वादात एका तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली असतानाच, क्षुल्लक कारणावरून एका  जोडप्याला मारहाण केल्याची घटना नागपुरात घडली आहे. 

नागपूरच्या सेंट्रल एव्हेन्यू भागातील एका पेट्रोल पंपवार ही घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाले आहे. 

दुचाकी वाहनावरून उतरताना मागील वाहन चालकाला युवतीचा पाय लागला. त्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान भांडणात झाले आणि मागे असलेल्या वाहनचालकांनी युवती सोबत असलेल्या तिच्या पतीला मारहाण केली. 

पेट्रोल पंपावरील इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्ती करून भांडण थांबवले म्हणून कोणीही पोलिसात तक्रार केली नाही.