माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीचा धक्का

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसलाय. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या हर्षवर्धन पाटलांच्या सत्तेला राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरूंग लावलाय.

Updated: Nov 21, 2016, 08:04 PM IST
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीचा धक्का title=

पुणे : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसलाय. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या हर्षवर्धन पाटलांच्या सत्तेला राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरूंग लावलाय. गेल्या ५६ वर्षांपासून ही समिती हर्षवर्धन पाटलांच्या घराण्याकडे होती. स्थापनेनंतर प्रथमच बाजार समितीत सत्तांतर झाले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळं हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांमध्येच थेट लढत होती. 

हर्षवर्धन पाटील यांची एक हाती सत्ता असणाऱ्या सहकारी संस्थावर आमदार दत्तात्रेय भरणे आता काबीज करु लागले आहेत. या पराभवामुळं ऐन 
तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकातही पाटलांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.