कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मुकुंद अभ्यंकरांना अटक

कॉसमॉस बँकेचे चेअरमन डॉ. मुकुंद अभ्यंकर यांना पुणे पोलिसांनी अटक केलीय. 

Updated: Jul 18, 2016, 08:26 AM IST
कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मुकुंद अभ्यंकरांना अटक title=

पुणे : कॉसमॉस बँकेचे चेअरमन डॉ. मुकुंद अभ्यंकर यांना पुणे पोलिसांनी अटक केलीय. 

अभ्यंकर यांच्या गाडीच्या धडकेनं एका महिला दुचाकीस्वारचा मृत्यू झालाय. काल दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पुण्याच्या भांडारकर रस्त्यावर हा अपघात झाला. 

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अभ्यंकरांना अटक करण्यात आलीय. अरुंधती हसबनीस असे मृत महिलेचे नाव असून ती बँकेत कामाला होती. 

अरुंधती अॅक्टिव्हावरुन जात असताना अभ्यंकर यांच्या कारची धडक त्यांच्या गाडीला बसली. अरुंधती यांनी हेल्मेट घातले होते मात्र त्यानंतरही अपघातात त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. अपघातानानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले.